आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंतांचा गौरव:गुणवंत विद्यार्थ्यांचा‎ पारितोषिकाने सन्मान‎

सावदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सम्राट फाउंडेशन शिक्षण‎ संस्थेच्या सर्चलाईट इंग्लिश‎ मीडियम स्कूलमध्ये, गुणवंत‎ विद्यार्थ्यांना शनिवारी पारितोषिके‎ देऊन सन्मानित करण्यात आले.‎ सकाळी १० वाजता शाळेच्या‎ प्रांगणात विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ छत्रपती शिवाजी महाराज,‎ महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई‎ फुले, राजर्षी छत्रपती शाहू‎ महाराज,महामानव विश्वरत्न डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांना‎ अभिवादन करण्यात आले.‎

अध्यक्षस्थानी अनोमदर्शी तायडे‎ होते. दिवाळी सुटीनंतर विद्यार्थ्यांचा‎ शाळा प्रवेश झाल्यानंतर‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ शाळा प्रवेश दिनाच्या औचित्यावर‎ वाचन, लिखाण पंधरवडा शाळेत‎ आयोजित करण्यात आला होता.‎ त्याच पद्धतीने गेल्या महिनाभरात‎ विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींवर‎ लक्ष ठेवून प्रत्येक वर्गातून स्टार‎ ऑफ द मंथ, म्हणजेच त्या वर्गातील‎ त्या महिनाभरातील विद्यार्थ्यांचे‎ अवलोकन करून एक उत्कृष्ट‎ विद्यार्थी निवडला गेला.

त्यालाच‎ स्टार ऑफ द मंथ, या पुरस्काराने‎ सन्मानीत करण्यात आले. यामध्ये‎ इयत्ता पहिलीत नितिकेश तायडे,‎ आमोदा, दुसरीत प्रज्ञा भालेराव,‎ बामणोद, इयत्ता तिसरीत साहिल‎ साळवे, गाते, इयत्ता चौथी सिद्धेश‎ हिवरे, गाते, इयत्ता पाचवीमध्ये‎ अजिंक्य तायडे, कोचूर खुर्द, इयत्ता‎ सहावीत कुणाल तायडे, बामणोद,‎ तर इयत्ता सातवीक माया मोरे, गाते‎ या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन‎ सम्राट फाउंडेशन शिक्षण संस्थेचे‎ सहसचिव ॲड.योगेश तायडे व‎ चेअरमन अश्विनी तायडे‎ यांच्याहस्ते गौरवण्यात आले.‎ प्रास्ताविक पर्यवेक्षक पंकज बोदडे‎ यांनी केले. गुणवंत विद्यार्थी यादीचे‎ वाचन तेजस्विनी तायडे यांनी केले.‎ आभार रंजना बोदडे यांनी मानले.‎ सूत्रसंचालन दिपाली लहासे यांनी‎ केले. उत्तम मोरे, योगेश भालेराव,‎ संतोष साळवे, दीपक हिवरे, ईश्वर‎ सुरवाडे, प्रदीप तायडे, विक्रम‎ तायडे, कविता बैसाणे उपस्थित होते‎

बातम्या आणखी आहेत...