आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुलीसाठी ग्राहक रडारवर:थकबाकीदार 950 ग्राहकांचे मीटर जप्त करणार, 15 पथकांची नेमणूक

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील १०३० ग्राहकांकडे वीज कंपनीची सुमारे १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची तात्पुरती कारवाई करूनही यापैकी ९५० ग्राहकांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे आता त्यांचे कडील वीज मीटर जप्तीची धडक मोहीम १ डिसेंबरपासून सुरू आहे. १ ते ६ डिसेंबर या सहा दिवसांत ८० थकबाकीदारांचे मीटर काढण्यात आले. महिनाभरात उर्वरित ९५० पैकी १०० ग्राहकांचे मीटर जप्त करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, ही कारवाई झालेल्या ग्राहकांना पुन्हा वीजपुरवठा हवा असल्यास नवीन कनेक्शन घ्यावे लागेल. त्यासाठी डिमांड नोट भरावी लागेल.

फेजनुसार वेगवेगळी आहे डिमांड नोट थकबाकीपोटी एखाद्या वीज ग्राहकाचे मीटर ठराविक कालावधीनंतर जप्त करता येते. यानंतर संबंधित ग्राहकांला तेच मीटर पुनर्जोडणी शुल्क घेऊन पुन्हा बसवून दिले जात नाही. तर त्याला नव्याने कनेक्शन घ्यावे लागते. म्हणजेच पुन्हा दीड हजार रुपयांची डिमांड नाेट भरावी लागते. यानंतर जाेडणीचा खर्च सिंगल फेजसाठी ३५४, तर थ्री फेजला ५९० रूपये आहे.

सहा लाख रुपयांचे बिल वसूल शहरातील ज्या थकबाकीदार ग्राहकांचे मीटर जप्त केले आहे, अशा ८० जणांपैकी ५० ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी, दंड आणि नवीन डिमांड नोटसाठी शुल्क भरले. सर्व साेपस्कार पूर्ण करून त्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. या कारवाईत आतापर्यंत एकूण ६ लाख रूपयांची वसुली झाली. आता वीज कंपनीच्या रडारवर ९२० ग्राहक आहेत.

आधी सूचना दिली जाते, नंतरच हाेतेय कारवाई प्रत्येक थकबाकीदार ग्राहकाला पूर्वसूचना देऊन वीजपुरवठा खंडित केला जातो. यानंतर थकबाकी भरून व पुनर्जोडणीसाठी दाेन महिन्यांची मुदत दिली जाते. तरीही प्रतिसाद न दिल्यास मीटर जप्त केले जाते. - आर.बी.पद्मे, सहायक अभियंता, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...