आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात माेठी घसरण:किमान तापमान 11 अंशांवर ; थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसापासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान ११ अंशावर हाेते. तापमानात घट झाली असतांना थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानात माेठी घसरण झाली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमानात माेठी घट झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ७ किमीवरून १२ ते १५ किमीपर्यंत वाढला आहे. रात्रीच्या वेळी वाऱ्याची झुळूक अधिक वेगाने वाहत असल्याने काेरड्या हवामानात उत्तरेतील थंड वारे अधिक वेगाने वातावरण थंड करतात. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. साेमवारी भुसावळात किमान तापमान ११ अंशांपर्यंत होते.

बातम्या आणखी आहेत...