आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट कामांमुळे संताप:लोकार्पण न करताच आमदार माघारी ;  ठेकेदाराचे बिल थांबवून ब्लॅकलिस्टेडची सूचना

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून गोजोरा ते वांजोळा रस्त्याचे डांबरीकरण व गावादरम्यान काँक्रिटीकरण, पाईप मोरी आदी कामे करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) गोजोरा गावात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण होते. मात्र, गावात गेल्यावर कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार सावकारेंनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून लोकार्पण न करताच माघारी येणे पसंत केले. मात्र, ठेकेदाराचे बिल थांबवून ब्लॅकलिस्टेड करण्याची सूचना केली.

गोजोरा ते वांजोळा हा रस्ता प्रंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून मंजूर होता. या रस्त्यावर गावात काँक्रिटीकरण व पुढील भागात डांबरीकरण तसेच नाल्यावर पाईप मोरीचे काम मंजूर होते. हे काम पूर्ण झाल्याने शुक्रवारी आमदार सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण होते. त्यानुसार गावात आलेल्या आमदारांनी कामांची पाहणी केली.

कठोरा रस्ताही निकृष्ट, कामाची चौकशी होणार
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून कठोरा ते पिंप्रीसेकम या रस्त्याचे कामही निकृष्ट झाले आहे. याबाबतही तक्रारी असल्याने चौकशीची सूचना आमदारांनी केली. या मार्गावरील जुने ढापे तोडून नवीन करण्यात आले. मात्र, त्यांचे काम गुणवत्तेत नाही, अशी ओरड आहे.

बातम्या आणखी आहेत...