आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शेतकऱ्यांसोबत संवादासाठी आमदारांकडून शिवारफेरी

कुऱ्हेपानाचेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक दिवस बळीरासाठी उपक्रमात आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी मांडवेदिगर शिवार गाठून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती करणे व पूरक व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असते. मात्र, वेगवेगळ्या अडचणींमुळे येणारे नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणमिमांसा योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे व त्यावर उपाययोजनांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे शक्य व्हावे म्हणून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे.

त्यात आमदार सावकारे यांनी मांडवेदिगर शिवारात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कृषी तज्ञांच्या सल्यानुसार शेती करावी असे आवाहन केले. मांडवेदिगर ते भुसावळ-जामनेर रस्त्याला लागून असणारा रस्ता (मांडवेदिगर फाटा) दुरुस्तीचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

कृषी अधिकाऱ्यांनी गावातील पीक पद्धती, बदल करावयाच्या पीक पद्धती, कृषी तंत्रज्ञान, कपाशी पिकातील सापळा पद्धत, कृषीपूरक उद्योग याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सोप्या भाषेत माहिती दिली. कृषी सहसंचालक उल्हास ठाकूर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.हेमंत बाहेती, भुसावळचे मंडळ कृषी अधिकारी दिलीप चौधरी, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, कृषी सहाय्यक भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...