आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल हिसकावल्याची घटना:माेबाइल चाेरट्याला 15 तासांतच अटक

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन चालकाला थांबवून मोबाइल हिसकावल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ झाली होती. या गुन्ह्यातील भामट्याला बाजारपेठ पोलिसांनी १५ तासांत ताब्यात घेतले.

सुपडू पुंडलिक डोळे (रा.कापूसवाडी ता.जामनेर) हे पिकअपमध्ये भाजीपाला घेऊन शहरातील भाजी मार्केटमध्ये येत होते. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता अष्टभुजा देवी मंदिराजवळ एका जणाने त्यांना थांबवले. यानंतर डोळे हे गाडीतून खाली उतरल्यावर संशयिताने यांच्या खिशातील मोबाइल हिसकावला. डाेळे यांना धक्का मारून जमीनीवर पाडून पळ काढला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हाेता.

यानंतर हवालदार प्रशांत सोनार यांचा शहरातील कृष्णा उर्फ शूटर मिलिंद गायकवाड याच्यावर संशय बळावला. पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी डीबी पथकाला कारवाईची सूचना केली. यानुसार विजय नेरकर, प्रशांत सोनार व इतर सहकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दहा हजार रूपये किमतीचा माेबाइल जप्त केला. तपास विजय नेरकर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...