आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉक ड्रील:भुसावळ रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडून मॉक ड्रील ; आरपीएफच्या श्वान पथकाला बोलावण्यात आले

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांची तत्परता पाहण्यासाठी गुरुवारी अधिकारी भुसावळ स्थानकावर मॉक ड्रील घेतले गेले. तत्पूर्वी, जंक्शनवरील फलाट दोनवर एक बेवारस बॅग पडलेली आहे. त्यात बॉम्बसदृश्य वस्तू अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल व स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी तातडीने स्थानकावर धाव घेतली. जळगाव येथील बॉम्ब शोधक पथक आणि आरपीएफच्या श्वान पथकाला बोलावण्यात आले. सकाळी १०.३० वाजता रेल्वे स्थानकावर एवढा मोठा फौजफाटा पाहून प्रवासी देखील अचंब्यात पडले. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संशयित बॅग पडलेला परिसर तातडीने निर्मनुष्य केला. नंतर बॉम्ब शोधक पथकाने खबरदारी घेत बॅगेचे अ‍ॅन्टी हँडलिंग करत आरओव्ही पद्धतीने ती निकामी केली. दरम्यान, हा सर्व प्रकार मॉक ड्रील असल्याचे लक्षात आल्यावर यंत्रणा आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. १२.१० वाजेपर्यंत हे मॉक ड्रील सुरू होते. लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त अमितकुमार मनेळ, लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे व अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...