आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता:मान्सून 8 सप्टेंबरपासून पुन्हा सक्रिय होणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कमकुवत झालेला मान्सून आणि कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचल्याने घालमेल होणाऱ्या जिल्हावासीयांना ८ सप्टेंबर नंतर दिलासा मिळेल. कारण, ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

भुसावळ विभागात देखील ढगाळ वातावरण असल्याने आर्द्रता, तर मध्येच ऊन पडल्याने तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी देखील ३६ अंश तापमान होते. कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती ७ सप्टेंबरपर्यंत कायम राहील. यानंतर मात्र ८ तारखेपासून पाऊस वाढेल. पुढील चार दिवस तो जोरदार बॅटिंग करेल.

सध्या मान्सून कमकुवत
उत्तर मध्य महाराष्ट्रात आता काहीसा कमकुवत झालेला मान्सून ८ तारखेपासून पुन्हा सक्रिय होईल. ९ ते १२ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल.
डॉ.अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ, आयएमडी

बातम्या आणखी आहेत...