आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:नवजात अर्भकाला महानगरीच्या शौचालयात सोडून देणारी माता जेरबंद

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला अप महानगरीच्या एस-३ डब्यातील शौचालयात सोडून मातेने पलायन केले. ही घटना मंगळवारी (दि.१) पहाटे साडेतीन वाजता घडली. एका प्रवाशाने याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय घेरडे व सहकाऱ्यांनी भुसावळ ते पाचोरा दरम्यान गाडीची कसून तपासणी करत मातेचा शोध घेतला. यानंतर अर्भकासह तिला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मातेविरोधात गुन्हा दाखल केला.

महानगरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-३ मधून १९ वर्षीय अविवाहित युवती व तिची आजी खंडवा ते मुंबई प्रवास करत होती. यावेळी तरुणीला प्रसवकळा सुरू झाल्या. यानंतर तिने धावत्या रेल्वेतच पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. मात्र, बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याने त्याची वाच्यता टाळण्यासाठी तरुणीने बाळ शौचालयात टाकून पुन्हा सीटवरून जावून बसली. मात्र, हा प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवल्यामुळे बिंग फुटले.

बातम्या आणखी आहेत...