आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मोटारसायकल -रोडरोलरचा‎ अपघात; एक गंभीर जखमी‎

ऐनपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ऐनपूर-खिर्डी रस्त्यावर‎ सरदार वल्लभभाई पटेल‎ महाविद्यालयाच्या पुढे आवळ्याच्या‎ मळ्याजवळ रस्त्यावर उभ्या‎ असलेला रोड रोलर व‎ मोटारसायकल यांच्यात झालेल्या‎ अपघातात मोटारसायकलस्वार‎ जखमी झाल्याची घटना घडली.‎ शेखर गाढे (वय ४६) रा.रेंभाेटा‎ असे जखमी झालेल्या‎ माेटारसायकलस्वाराचे नाव आहे.‎ येथील खिर्डी रस्त्यावर‎ मोटारसायकल व रोड रोलर‎ यांच्यात झालेल्या अपघातात‎ मोटारसायकल स्वार शेखर गाढे‎ यांच्या डोक्याला तसेच पायांना मार‎ बसल्याने मोठ्या प्रमाणात‎ रक्तस्त्राव सुरू होता.

अशा‎ परिस्थितीत येथील सामाजिक‎ कार्यकर्त्यांनी जखमी झालेल्या‎ मोटारसायकल स्वारास येथील‎ प्राथमिक आरोग्य केंद्रात‎ उपचारासाठी दाखल केले.‎ रक्तस्त्राव माेठ्या प्रमाणात होत‎ असल्याने जखमी व्यक्तीवर उपचार‎ करून पुढील उपचारासाठी तातडीने‎ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात‎ पाठवण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...