आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस-दुचाकीच्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी; जखमीला जळगावला हलवण्यात आले

यावल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिळोदा-थोरगव्हाण रस्त्यावर दुचाकीची एस.टी. बसला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. कानात इयर फोन टाकून मोबाइलवर संभाषण करताना समोरून येणाऱ्या बसचे भान त्यास राहिले नाही आअणि त्यामुले हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला. जखमीला जळगावला हलवण्यात आले आहे.

यावल एस.टी. आगाराची बस (क्र.एमएच १४ बीटी १८७३) गुरुवारी दुपारी यावल येथून थोरगव्हाणकडे जात होती. दरम्यान अडीच वाजेच्या सुमारास थोरगव्हाणकडून दुचाकी (क्र.एमएच १९ डीएन ९९८५)वरून राज साळुंके, रा.जळगाव हा कानात इअरफोन लावून मोबाइलवर संभाषण करत पिळोद्याकडे जात होता. त्यावेळी त्याने समोरून येणाऱ्या एस.टी. बसला थेट धडक दिली. अपघातात एस.टी. बसचे समोरील काच फुटून नुकसान झाले. जखमी झालेल्या राज साळुंके यास तातडीने जळगावला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. जखमी राज साळुंके हा पिळोदा खुर्द फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी देखरेखीच्या कामावर आहे.

बातम्या आणखी आहेत...