आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत संसदेत असभ्य वर्तन व अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. याप्रकरणी यावलमध्ये सायंकाळी निषेध आंदोलन देखील केले.
शहरातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील काँग्रेस कार्यालयाजवळ रावेर-यावल विधानसभा युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा निषेध केला. सायंकाळी साडेसहा वाजता एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात जाेरदार घोषणाबाजी केली. युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, शेख सद्दाम, सर्फराज शाह, इरफान खान, विकी गजरे, कपिल खान, मो. आदिल नसिमुद्दीन, जव्वाद खान, सकलैन शेख, अबरार शेख, अजहर शेख आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.