आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:शौचालय गैरव्यवहार दडपण्यासाठी हालचाली; सात दिवसांची मुदत, महिना संपूनही अहवाल नाही

रावेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वैयक्तिक शौचालय योजनेतील गैरव्यवहारात नेमके कोण दोषी आहेत? हे अद्यापही उघड झालेले नाही. चौकशीसाठी नियुक्त समिती दिरंगाई करीत आहे. प्रकरण दडपण्यासाठी पंचायत समितीत काही अधिकाऱ्यांकडून छुपे प्रयत्न सुरु असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज आहे.

शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी प्रस्ताव सादर केल्यावर ग्रामविस्तार अधिकारी अचानक भेटी देऊन लाभार्थीने शौचालयाचे बांधकाम केले आहे किंवा नाही? याची तपासणी करतात. नंतर शौचालय बांधकाम केल्याचा अहवाल वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकाऱ्यांकडे सादर केला जातो. लाभार्थींच्या नावाची व बँक खाते क्रमांकाची यादीची पडताळणी केल्यावर लेखाधिकारी अनुदानाची १२ हजारांची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करतात. या रकमेच्या धनादेशावर बीडीओ व वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते. एवढ्या मोठ्या प्रक्रियेतून लाभार्थींना अनुदान दिले जाते. मात्र, यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार असल्याने प्रक्रियेतील संबंधित सर्वां-भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...