आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:लग्नासाठी पळवून नेत युवतीची एमपीत विक्री; चार महिलांसह 8 जणांवर गुन्हा

रावेर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाल येथील एका पंचवीस वर्षीय तरुणीला नाष्ट्यातून गुंगीचे औषध देऊन तिची दोन लाख रुपयांत विवाहासाठी मध्य प्रदेशात विक्री करण्यात आली. या युवतीला डांबून ठेवत शारीरिक व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार महिलांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तालुक्यातील पाल येथील एका पंचवीस वर्षीय तरुणीला दोन अनोळखी महिलांनी नाष्ट्यातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यावर तिची विवाहाच्या उद्देशाने मध्य प्रदेशात विक्री केली. या दोन्ही अनोळखी महिलांनी या युवतीचा उज्जैन जिल्ह्यातील राकेश भगीरथ वर्मा याचेशी विवाह लावून दिला. नंतर या पीडित तरुणीचा पती राकेश वर्मा याने तिच्यावर रावेर बस स्टँड, नणंद तेजू हिच्या घरी व स्वत:च्या घरी वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.

तसेच पीडितेची सासू शामू भगीरथ वर्मा, सासरे भगीरथ वर्मा, दीर कमल वर्मा व दिनेश वर्मा (सर्व रा.घाटपिपल्या ता.झरडा, जि.उजैन) व नणंद तेजू (रा.घोयाला, जि.उज्जैन) यांनी तिला युवतीला डांबून ठेवत मारहाण केली. ही घटना १३ जुलै २०२१ ते १२ जून २०२२ या काळात घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिलासह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...