आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष गाड्या:मुंबई ते बलिया; गोरखपूर विशेष गाड्या धावणार

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाताळ आणि थर्टीफर्स्टला रेल्वे गाड्यांना गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तीन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.०१०२५ दादर ते बलिया तिरंगी साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी १६ ते ३० डिसेंबर या काळात सोमवार, बुधवार, शुक्रवारी चालवण्यात येईल. या गाड्यांचे बुकिंग १३ डिसेंबरपासून सुरू झाले. ०१०२६ बलिया ते दादर साप्ताहिक गाडी १८ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात बुधवार, शुक्रवार, रविवारी धावेल. या गाडीच्या एकुण सात फेऱ्या हाेतील.

०१०२७ दादर ते गोरखपूर ही विशेष गाडी १७ ते ३१ डिसेंबर या काळात दर मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवारी धावेल. गाेरखपूर-दादर ही विशेष गाडी साेमवार, मंगळवार, गुरूवारी व शनिवारी अशी आठवड्यातून चार दिवस १९ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात चालवण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...