आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:पालिका निवडणूक, प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला मुदतवाढ

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ जून रोजी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. २१ जूनला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करुन २७ जूनपर्यंत हरकतींची मुदत होती. मात्र, राज्यातील अ वर्ग पालिकांना दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१०) मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाबाबत १७ जूनला सुधारित आदेश निघाले. ३१ मे २०२२ ची कट ऑफ डेट जाहीर केली. नवीन कार्यक्रमानुसार २५ जूनला यादी प्रसिद्ध करणे, २५ जून ते १ जुलैदरम्यान हरकती मागवणे, ५ जुलैला अंतीम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करणे व ९ जुलैला मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यानंतर राजकीय घडामोडी वाढतील.