आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:पालिका निवडणूक; आज प्रसिद्ध होणार प्रभाग रचना

भुसावळ7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी राज्य शासनाकडून वॉर्ड रचनेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने मात्र प्रक्रिया पूर्ववत ठेवली आहे. यानुसार पालिकेची प्रभाग रचना गुरुवारी (दि.१०) प्रसिद्ध होणार आहे. ही प्रक्रिया म्हणजे पालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे संकेत देणारी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचना करणे व हद्दी निश्चित करण्याची अधिकार प्रक्रिया स्वत:कडे घेण्याबाबत राज्य शासनाने कायदा केला आहे. यामुळे यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी प्रभाग रचना प्रसिद्ध होईल किंवा नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, भुसावळ पालिकेची प्रभाग रचना गुरुवारी जाहीर होणार आहे. प्रारूप रचना, प्रभाग दर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालय व भुसावळ नगरपालिकेचे नोटीस बोर्ड, भुसावळ उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.jalgaon.gov.in, पालिकेचे संकेतस्थळ https:/bhusavalmahaaulb.maharashtra.gov.in येथे प्रसिद्ध होणार आहे. या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी १७ मार्च पर्यंतची मुदत आहे.

बातम्या आणखी आहेत...