आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नगरपालिकेचे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तत्काळ द्यावी यासह २६ व स्थानिक ११ मागण्यांसाठी नगरपालिका वर्कर्स युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात ५ एप्रिलला काळ्या फिती लावून निदर्शने, २० एप्रिलला मुंबईत मोर्चा व धरणे आंदोलन, तर एक मे पासून ध्वज वंदनानंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आला.

राज्यातील नगरपालिकांना सहाय्यक अनुदान वितरित करणे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे, नियमित व वेळेवर वेतन देणे, अनुदान असूनही दर महिन्याच्या दहा तारखेनंतरच पगार केला जातो यामुळे बँकेच्या कर्जाचा हप्ता वेळेवर जमा होत नाही, हे प्रकार रोखणे, सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती, अशा विविध मागण्यांसाठी पालिका वर्कर्स युनियनने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच राज्यस्तरावरील २६ व स्थानिक ११ मागण्यांची पूर्तता न झाल्यास ५ एप्रिलला काळ्या फिती लावून पालिकेसमोर निदर्शन होतील.

यानंतरच्या टप्प्यात भुसावळसह राज्यभरातील पालिका कर्मचारी मुंबई येथील नगरपालिका प्रशासन (वरळी) कार्यालयावर मोर्चा काढतील. तरीही दखल न घेतल्यास १ मे रोजी ध्वजारोहणानंतर बेमुदत काम बंद पुकारले जाईल. याबाबत पालिकेत वर्कर्स युनियनने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...