आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांना दिलासा:पालिका रुग्णालय ते लोखंडी पूल रस्ता फक्त पादचाऱ्यांसाठी खुला ; वाहने वापरास मात्र बंदी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पूल या रस्त्याचे काँक्रिटीकरण चतुर्भुज कन्स्ट्रक्शनचे योगेश पाटील यांनी अवघ्या १८ दिवसांत पूर्ण केले आहे. हा मार्ग ३ सप्टेंबरपासून पादचाऱ्यांसाठी खुला होईल. मात्र, पुढील २१ दिवस दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी असेल. २३ सप्टेंबरपासून तो सर्वांसाठी खुला करण्यात येईल.पालिका रुग्णालय ते लोखंडी पुलापर्यंत आरसीसी रोड, गटार बनवण्याच्या कामाला १६ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती. हे काम दोन ऐवजी एकाच टप्प्यात पूर्ण करण्यात आले. या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे. मात्र, २४८ मीटर लांब व १२ मीटर रुंदीचा हा रस्ता - ठेकेदाराने केवळ १८ दिवसांत पूर्ण केला. शुक्रवारी सायंकाळी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी सायंकाळी हा रस्ता पादचाऱ्यांसाठी खुला होईल. मात्र, पुढील २१ दिवस दुचाकी, चारचाकी वाहने त्यावरून नेता येणार नाहीत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्युरिंगसाठी मोठ्या वाहनांचा वापर बंद असेल. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. गणेश विसर्जनासाठी देखील मार्गावरुन नागरिकांना पायी वापरता येईल.

ड्रेनेज, ढाप्यांचे नियोजन
महाराणा प्रताप चौक ते हंबर्डीकर चौक या मार्गावर रस्ता काँक्रिटीकरणासोबतच पश्चिमेकडील भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी आरसीसी गटार करण्यात आली आहे. या गटारीचे ड्रेनेज पालिका रुग्णालयाच्या मागील भागात काढले जाणार आहे. यासाठी ५० मीटर लांब बंदिस्त गटार बांधली जाईल. रस्त्यावरील गटारीवर दुकानांच्या समोर ढापे ठेवले जातील. यामुळे दुकानदाराची गैरसोय टळेल.

१८ ऑगस्टला सुरुवात २ सप्टेंबरला काम झाले पूर्ण
२४८ मीटर लांब व १२ मीटर रुंद रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी पालिकेने ३० जूनला वर्क ऑर्डर दिली. या कामाला ३० ऑक्टोबरपर्यंत १२० दिवसांची मुदत होती. मात्र, ठेकेदाराने १६ ऑगस्टला काम सुरू करून ते २ सप्टेंबरला पूर्ण केले. म्हणजेच काँक्रिटीकरण १८ दिवसांत पूर्ण झाले. यासाठी दररोज २० ते २२ कामगार, ३ जेसीबी, ५ ट्रॅक्टर, २ काँक्रिट मिक्सर, ५ डंपरचा वापर झाला. चार तज्ज्ञ अभियंते या कामावर लक्ष ठेवून होते.

...तर रस्ता खराब होईल
^केवळ १८ दिवसांत गुणवत्तापूर्ण रस्ता तयार केला. आता क्युरिंगसाठी २१ दिवस हा रस्ता बंद राहील. या कालावधीत कुणीही रस्त्यावरून वाहने नेऊ नयेत. अन्यथा रस्त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते.
योगेश पाटील, चर्तुभुज कंन्स्ट्रक्शन

बातम्या आणखी आहेत...