आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:उधारीच्या 130 रुपयांसाठी ऐनपूर येथे तरुणाचा खून; पोलिसात गुन्हा नोंद

ऐनपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उधारीच्या १३० रुपयांवरून वाद झाल्याने गुप्तांग पिळून तरुणाचा खून झाल्याची घटना येथील रामदेव बाबा नगरात (वाल्मीक नगर) गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. भीमसिंग जगदीश पवार (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. गुरुवारी भीमसिंग फिरत असताना ते उधारीचे पैसे देण्या-घेण्यावरून दाेघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर यातील आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला आहे. या घटनेची दखल घेऊन फैजपूर विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तपासाच्या सूचनाही दिल्या.

या गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ याच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करत आहेत. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...