आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय सलोख्याचे दर्शन:गणेश विसर्जनासाठी मुस्लिम तडवी तरुणांनी केली मदत

यावल25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पाचव्या दिवशी रविवारी ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक कुटुंबांनी बाप्पाला निरोप दिला. चुंचाळे, नायगाव व सावखेडासिम येथील भाविकांनी सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात बाप्पाचे विधिवत विसर्जन केले. यावेळी खोल पाण्यात विसर्जनासाठी मुस्लिम तडवी समाजातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी पुढाकार घेत जातीय सलोख्याचे दर्शन घडवले.

सावखेडासीम, नायगाव, चिंचाळे येथील भाविक गणेश विसर्जनासाठी निंबादेवी धरणावर जातात. मात्र, यंदा धरणात विपुल जलसाठा आहे. त्यामुळे खोल पाण्यात विसर्जनासाठी गेल्यास दुर्घटना होऊ शकते. अशी दुर्घटना टाळण्यासाठी मुस्लिम तडवी समाजातील तरुणांनी विसर्जनासाठी मदत केली. यात सावखेडासिम येथील शाहरुख तडवी, जावेद तडवी, याकूब तडवी, नायगाव येथील संजू तडवी, मरेखॉ तडवी अशी त्यांची नावे आहेत. सावखेडासिम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांच्या देखरेखीत घरगुती गणेश विसर्जन संपन्न झाले. त्यांनी मुस्लिम तडवी तरुणांनी केलेल्या मदतीबद्दल कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...