आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नायब तहसीलदार; लिपिकास दोन दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनकल्याण अर्बन संस्थेचे प्लाॅट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी परस्पर विक्री केल्याप्रकरणी, अटकेतील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना न्यायालयाने यापुर्वी पाेलिस काेठडी सुनावली होती. कोठडीची मुदत गुरूवारी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांची बनावट सही व शिक्का वापरून, संस्थेचे दहा प्लाॅट परस्पर विक्री केले. याप्रकरणी धांडेंसह संस्थेचे प्लाॅट घेणाऱ्या दहा जणांवर शहर पााेलिस ठाण्यात रविवारी (दि.१७) गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी रविवारी पोलिसांनी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक केली हाेती. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...