आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पावसाळ्यापूर्वीच्या पूर्वतयारी बाबत अद्याप नगर परिषद विभाग गंभीर दिसत नसल्याने शहरातील बहुतांश प्रभागातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे शहर नगर परिषदेला त्याची साफसफाई करावी लागणार आहे. वेळेवर साफसफाई केली जात नसल्याने येत्या पावसाळ्यात शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास घाण पाणी रस्त्यावर व घरापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील पालिकेवर भाजपची सत्ता होती. परंतु मागील ४ डिसेंबर पासून भाजपचा कार्यकाळ संपला, तेव्हापासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी दिली होती. नाल्याचे पाणी सिंधी कॅम्पमधून वाहते, हेच पाणी भुसावळ चौक पुलावरून जावून फरशी पुलावरून वाहते, हा पुल मागील वर्षी पडला होता, तो आजपर्यंत दुरुस्त करण्यात आला नाही. शिवाय टिळक मैदान आणि मस्तान चौकांना जोडणाऱ्या पुलाचे ड्रेनेज पाइप, जलालपुरा ते जुना फैलला जोडणाऱ्या पुलाच्या तसेच जुना फैल ते मच्छी बाजार आणि शिवाजी नगर यांना जोडणाऱ्या पुलाच्या खालचा भाग काही दिवसांत साफ न झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहुन जाण्याची शक्यता आहे. स्वच्छते अभावी पावसाचे पाणी जुन्या वस्तीतील घरात शिरते. तसेच प्रत्येक वॉर्डाची दुरुस्ती करणे, परिसरातील नाली, रस्ते, पथदिवे दुरुस्त करणे, जिया कॉलनीतील बुस्टर पंप हाऊसपासून ते क्रीडांगणा पर्यंतची नाली साफ करणे आवश्यक आहे. कारण या नालीत मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे बूस्टर पंप हाऊस ते क्रीडांगण या मार्गावर पावसाचे पाणी तुंबते. त्यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शहर क्रमांक दोन मधील रहिवाशांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. क्रीडांगणापासून नाल्या तयार केल्या आहेत. परंतु या नाल्या तुंबल्याने नाल्यातील घाण पाणी पुन्हा घरांमध्ये येते, त्यामुळे पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. पावसाच्या दिवसात रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या पालिकेतील प्रशासक मनोहर अकोटकर यांची जबाबदारी काय, पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य पांडे, अनंता नेले, सुनील राजपूत, ललित अहिरवाल या तीन आरोग्य निरीक्षकांवर विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.