आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालेसफाई:नालेसफाई : पालिका म्हणते काम पूर्ण, वस्तुस्थिती : नाल्यामध्ये साचला गाळ

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून वाहणाऱ्या बलबलकाशी नाल्यात पावसाळ्यात पाणी तुंबते. यामुळे काठावरील रहिवासी भागात पाणी शिरून तारांबळ उडते. आपत्तीची तीव्रता वाढल्यास मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे पालिका दरवर्षी नालेसफाई करते. आता पालिकेच्या दाव्यानुसार गेल्या वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात नालेसफाई झाली होती. यंदा ती मार्च, एप्रिलमध्ये करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र नाल्यात जागोजागी गाळ, कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नालेसफाई होऊनही एवढा कचरा साचला कसा? पावसाळ्यात नाला तुंबून आपत्ती ओढवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बलबलकाशी नाल्याचे जणू डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर हाेत आहे. कारण, या नाल्यात अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा, गाळाचे ढीग साचले साचून झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे पावसाळ्यात नाल्यातून पाण्याचा निचरा करण्यास अडथळा ठरू शकतात. गेल्या वर्षी देखील पावसाळा संपल्यावर नालेसफाई झाली होती. तत्पूर्वी, पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्यांमुळे भुसावळकरांची त्रेधा उडाली होती. यंदा पालिकेतर्फे मार्च, एप्रिलमहिन्यातच नाल्यांची सफाई केल्याचे पालिकेचे मुध्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले. गेतवर्षीचा अनुभव पाहता यंदा उन्हाळ्यातच हे काम केल्याचे ते म्हणाले. मात्र, बलबलकाशी नाल्याची प्रत्यक्ष स्थिती पाहिल्यावर अनेक ठिकाणी गाळ, कचरा साचल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्यक्ष नालेसफाई सुरू असताना पालिका कर्मचारी कुठे होते? पावसाळा अवघ्या २२ दिवसांवर असताना नाला गाळ, कचऱ्याचे तुंबला कसा? हा प्रश्न कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...