आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रिटीकरणाचे काम:कोंडी करणाऱ्यांना दिली नाेटीस

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने लोखंडी पूल ते हंबर्डीकर चाैक हा रस्ता वाहतुकीला बंद केला अाहे. परिणामी सध्या दगडी पुलाखालून वाहतूक हाेत आहे. या वाहतुकीमुळे वारंवार कोंडी होते. याच वर्दळीच्या रस्त्यावर काही व्यावसायिक दुकानातील साहित्य ठेवतात.

अशा हॉटेलसह अन्य पाच व्यावसायिकांना शहर वाहतूक शाखेने नाेटीस बजावली. गवळी वाड्यात देखील घराबाहेर ठेवलेले साहित्य उचलून घेण्याची सूचना वाहतूक शाखेचे निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी रहिवाशांना केली. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास साहित्य जप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...