आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:डाक विभागातर्फे रविवारपासून राष्ट्रीय टपाल सप्ताह

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाक विभाग दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो. यंदा जागतिक टपाल दिन सप्ताहाला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. ‘पोस्ट फॉर प्लॅनेट’ अशी यंदाची संकल्पना आहे. त्यात १३ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम राबवण्यात येतील. रविवारी (दि.९) जागतिक टपाल दिन, १०ला वित्तीय सशक्तीकरण दिवस, ११ ऑक्टोबरला फिलाटेली दिवस साजरा होईल. यात भुसावळ प्रधान डाकघर येथे प्रश्नमंजुषा व ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा होईल. १२ला मेल्स आणि पार्सल दिवस, १३ ऑक्टोबरला अंत्योदय दिवस साजरा होईल. याशिवाय डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल, असे डाक अधीक्षक यू.पी.दुसाने यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...