आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेषणा:यावल, रावेरात महागाईच्या धाेरणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निदर्शने, घाेषणांनी केला निषेध

यावल25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५० खोके.. एकदम ओके.. आदी घोषणा देत युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथील तहसील कार्यालयात महागाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देत महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रवींद्र पाटील व तालुकाध्यक्ष ॲड.देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करत तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले. या आंदाेलन प्रसंगी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात ५० खोके एकदम ओके म्हणत नकली नोटा चिकटवलेले खोके घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, राजू पाटील, समन्वयक किशोर माळी, नरेंद्र शिंदे, नरेंद्र सोनवणे अादींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेरातही घाेषणा देत केला निषेध वाढत्या महागाईच्या निषेधार्थ रावेर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर ‘५० खोके... महागाई ओके’ अशा घोषणा देत खाेके दाखवत आंदोलन झाले.

केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, दीपक पाटील, पांडुरंग पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मेहमूद शेख सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...