आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:नवाेदयचे प्रवेश अर्ज भरणे सुरू, 11 फेब्रुवारीला परीक्षा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या इयत्ता नववीच्या वर्गात रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर आहे. परीक्षा ११ फेब्रुवारी २०२३ होणार आहे.

नवोदय विद्यालयांमधील उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी समितीने इयत्ता नववीच्या रिक्त जागा अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे.

आठवी उत्तीर्ण असेल पात्र
या परीक्षेचे प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in किंवा www.nasadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करून यंदा आठवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदयने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...