आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी कार्यकर्ते:बोदवडमध्ये डीजेच्या तालावर थिरकले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ; एकनाथ खडसे हे विधान परिषदेत विजयी झाल्यावद्दल जल्लोष

बोदवड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री एकनाथ खडसे हे विधान परिषदेत विजयी झाल्याने बोदवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाके फोडले.डीजेच्या तालावर नाचत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केली. जल्लोष करताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून आले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त त्यात दिसून आले नाहीत. उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, मधुकर राणे, नगरसेवक दीपक झाबड, भरत पाटील, हाकिम बागवान, लतीफ शेख, गोपाल गंगातिरे आदींची उपस्थिती होती. खडसे सभागृहात असल्याने जिल्ह्याचे प्रश्न, समस्यांना वाचा फुटेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...