आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील व केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरले. कापूस, कांद्याला भाव नाही, केळी पीक विम्याचा, केळीवरील सीएमव्ही रोगाचा प्रश्न सरकारने योग्य पद्धतीने हाताळला नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान अजून मिळाले नाही. गॅस दरवाढ होत असून महागाई वाढत आहे. अशा विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याने हे विविध प्रश्न खोक्यांवर लिहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ५० खोक्यांची होळी केली. यावेळी रोहिणी खडसे यांनी होळीचे पूजन केले. तर माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.
उपस्थित कार्यकर्त्यांनी ५० खोके, एकदम ओके, शेतमालास भाव न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी सभापती निवृत्ती पाटील, राकाँ तालुकाध्यक्ष यू.डी. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, बबलू सापधरे, माजी सभापती विलास धायडे, जि.प. सदस्य नीलेश पाटील, प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, अनिल पाटील, एजाज खान, रामभाऊ पाटील, सुनील काटे अादी उपस्थित होते.
सरकार अपयशी; जनता त्रस्त : खडसे
राज्यातील सरकार सर्व प्रश्नांवर अपयशी ठरत असून जनता त्रस्त आहे. होळीत आपण सर्व निराशा व वाईट गोष्टींचे दहन करतो. त्यामुळे ही ५० खोक्यांचे जळमटे होळीत जाळून टाकण्यासाठी या प्रतीकात्मक होळीचे आयोजन केल्याचे खडसे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.