आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राष्ट्रवादीचा आंदोलनातून बंडखोर आमदारांना चिमटा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात महागाईचा भडका उडून सर्वसामान्य लोकांचे जीवन कष्टमय झाले आहे. दुसरीकडे राज्यातील नवीन सरकारचा भाेंगळ कारभार सुरू आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी भुसावळात आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ‘५० खाेके महागाई एकदम आेके’ अशी घोषणाबाजी करत राज्यातील बंडखोर आमदारांना चिमटे घेतले. नंतर तहसीलदाराना निवेदन दिले.

आंदोलक पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आता केवळ राजकीय आकसातून रद्द करणे, राज्यातील विकास कामांना स्थगितीचे प्रकार शिंदे सरकार करत आहे, असा आरोप केला. आंदोलकांनी गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन तेथून सरकारविरुद्ध घाेेषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. तेथे नायब तहसीलदार अंगद आसटकर यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष याेगेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...