आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत गटारीच्या कामाला सुरूवात:भूमिगत गटार हवी, पण काम दिवाळीनंतर करा; व्यावसायिकांचे आमदारांना साकडे, ऐन पावसाळ्यात होणाऱ्या खोदकामाचा व्यवसायावर परिणाम

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका दवाखान्यापासून शहरात भूमिगत गटारीच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, केवळ चार मजुरांद्वारे संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे दुकानदार, व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेने दिवाळीनंतर या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी या भागातील व्यापाऱ्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली.

यानंतर आमदारांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी व्यावसायिकांनी सणासुदीत ग्राहकांची गैरसोय झाल्यास थेट व्यवसायावर परिणाम होईल. त्यामुळे दिवाळीनंतर काम करावे, अशी विनंती केली. निर्मल कोठारी, प्रसन्न पांडे, प्रसाद पांडे, संदीप देवडा, मंगेश यावलकर, सुनील जैन, राजाभाऊ काबरा, कपिल मेहता, जितेंद्र वायकाेळे, चेतन जैन, विशाल जैन, लखन अग्रवाल आदी उपस्थित हाेते.

सीओंकडे लावणार बैठक, व्यापाऱ्यांना बोलावणार
भूमिगत गटारीसाठी सुरू असलेले खोदकाम आणि व्यापाऱ्यांची समस्या पाहता पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे बैठक लावू. तेथे व्यावसायिकांना देखील बोलावू. दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असे आमदार सावकारेंनी व्यावसायिकांना सांगितले

बातम्या आणखी आहेत...