आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग.स.च्या नूतन संचालकांचा पारोळ्यात सत्कार ; विरोधात असतांनाही सभासद हित जोपासण्याचा प्रयत्न करणार

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळात पश्चिम सोसायटीतर्फे ग. स. सोसायटीच्या नूतन संचालकांचा गौरव करण्यात आला. या वेळी सोसायटीच्या नवनिर्वाचित सभासदांनी विरोधात राहूनही सभासदांचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संस्थेचे संस्थापक यु. एच. करोडपती, लोक सहकार गटाचे मनोज पाटील, प्रगती गटाचे रावसाहेब पाटील, योगेश सनेर, अमरसिंग पवार, नीलेश पाटील, विजय पवार, मनोज माळी, अजय सोमवंशी, अनिल गायकवाड यांचा भरत पाटील व प्रवीण पाटील, संचालक राजेंद्र सोनवणे, पंकज बडगुजर, नाना साळुंखे, अनिल पाटील, उज्ज्वला पाटील, धीरज पाटील, भागवत हाडके, दीपक गिरासे, राजेंद्र पाटील, अरुण पाटील, आर. एल. पाटील यानी सत्कार केला. यासह आर. जे. पाटील, डॉ. शांताराम पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, यशवंत शिंदे, ईश्वर पाटील यांचा सत्कार कर्मचाऱ्यांनी केला. सूत्रसंचालन हेमंत पाटील तर आर. एल. पाटील यांनी आभार मानले. रावसाहेब पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना सभासदांच्या हिताचे निर्णय तसेच जाहीरनाम्यानुसार कामकाज करण्यास भाग पाडू. सभासदांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. यासाठी प्रयत्न करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...