आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजक:जळगाव रोडवरील नवे दुभाजक सीओंनी तोडले ; बांधकामात कमी सळई वापरल्याचा आक्षेप

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जळगाव रोडवरील रस्ता दुभाजकांच्या कामात सळईचा वापर तसेच उंचीबाबत शंका आल्याने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी हे बांधकाम स्वत: उभे राहून तोडले. यामुळे एकच खळबळ उडाली.रविवारी सायंकाळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे जळगाव येथून आपल्या परिवारासोबत येत होते. जळगाव रोडवरील लोणारी हॉलजवळ रस्ता दुभाजकांचे काम सुरु आहे. या कामाजवळ त्यांनी आपले वाहन थांबवून पाहणी केली. या कामात प्रमाणापेक्षा कमी सळई वापरली जात आहे, तसेच उंची कमी असल्याने त्यांनी हे बांधकाम तातडीने तोडण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, संबंधित ठेकेदार व बांधकाम पर्यवेक्षकांनी हे अपूर्ण काम आहे. त्यावर पुन्हा एक फूट उंची वाढणार असल्याचे सांगितले. मात्र, मुख्याधिकारी चिद्रवार आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी जेसीबी मागवून हे बांधकाम तोडण्यासाठी घटनास्थळी ठिय्या मांडला. जेसीबी उपलब्ध न झाल्याने अखेर मजुरांच्या माध्यमातून फावड्यांनी हे दुभाजकाचे बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांच्या निकटवर्ती माजी नगरसेवकाच्या माध्यमातून हे काम होत आहे. या कामावर झालेल्या या धडक कारवाईमुळे मुख्याधिकाऱ्यांनी थेट आमदारांना डिवचल्याची कुजबूज होती.

पोलिस बंदोबस्तात कारवाई
जळगाव रोडवरील रस्ता दुभाजकाचे काम अनियमित व नियमबाह्य होत असल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकाऱ्यांनी ते तोडण्याची कारवाई केली. यावेळी वाद निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाल्याने शहर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त कारवाईस्थळी तैनात करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...