आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज्युकेशन:नूतन मराठा कॉलेज; हार्टफुलनेस‎ एज्युकेशन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार‎

जळगाव‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन मराठा महाविद्यालय जळगाव‎ व हार्टफुलनेस एज्युकेशनल ट्रस्ट ‎यांच्यात बुधवारी सामंजस्य‎ करारावर स्वाक्षऱ्या करण्यात‎ आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील ‎ ‎ विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास‎ तसेच महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मानसिक व‎ आध्यात्मिक आरोग्यासाठी‎ फायदेशीर ठरेल.‎ नूतन मराठा महाविद्यालयत‎ बहुसंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थि‎ असून या सामंजस्य कराराद्वारे‎ विद्यार्थी व महाविद्यालयातील‎ कर्मचाऱ्यांसाठी मानसिक,‎ अध्यात्मिक, आरोग्य कार्यशाळांचे‎ आयोजन करण्यात येणार आहे.

या‎ सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी‎ तर हार्टफुलनेसतर्फे विभागीय‎‎ समन्वय डॉ. विकास देव यांनी‎ स्वाक्षऱ्या केल्या. हार्टफुलनेस‎ एज्युकेशन ट्रस्टचे जागतिक‎ मुख्यालय हैद्राबाद येथे असून १६०‎ देशात विस्तार आहे. पदवी आणि‎ पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन‎ प्रोग्राम, स्टार्टअप, लीडरशिप‎ मास्टरी प्रोग्राम आणि मेडिटेशन‎ कॅम्पचे आयोजन केले जाते.‎ करारवर स्वाक्षरी करताना प्राचार्य‎‎ डॉ. देशमुख यांनी‎ महाविद्यालयातील ग्रामीण‎ भागातील विद्यार्थ्यांकडे कौशल्य‎ आहे. हार्टफूलनेसच्या उपक्रमांमुळे‎ त्यांचे कौशल्य अधिक विकसित‎ होतील असे सांगितले. यावेळी प्रा.‎ डॉ. माधुरी पाटील, प्रा. ए. वाय.‎ बडगुजर, प्रा. डॉ. के. बी. पाटील,‎ डॉ. नीलम अग्रवाल, मीनाक्षी‎ पाटील उपस्थित होते.‎