आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, मोंढाळा, पिंपळगाव खुर्द, कन्हाळा बुद्रुक आणि कन्हाळा खुर्द या सहा ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आता मंगळवारी (दि.२०) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. अवघ्या तासाभरात सहा गावांचे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचे निकाल लागतील.
तहसीलाच्या आवारातील गोदामात टेबल मांडून ही मोजणी होईल. त्यासाठी २५ कर्मचारी नेमले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत एक सहाय्यक आणि शिपाई तसेच महसूल कर्मचारी मतमोजणीस्थळी उपस्थित असतील. सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी तासाभरात पूर्ण होईल असे अंदाज आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार शोभा घुले, भाऊसाहेब शिरसाठ, योगेश मुस्कावाड हे लक्ष ठेऊन असतील. मतमोजणीस्थळी केवळ उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश असेल.
तळवेलला पाच फेऱ्या तळवेल वगळता सर्व गावांमध्ये तीन फेऱ्यांमध्ये मोजणी होईल. तळवेल येथे पाच फेऱ्यांमध्ये निकाल घोषित होतील. तळवेल ही तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.