आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा:काँक्रिटीकरण, दुभाजक नूतनीकरणासाठी नव्याने काढली निविदा ; आता नव्याने निविदा काढण्यात आली

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ३ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपयांच्या निधीतून होणारे रस्ता काँक्रीटीकरण व नवीन दुभाजकांचे काम, ठेकेदाराने मुदतीत न केल्याने पालिकेने निविदा रद्द केली होती. या कामासाठी आता नव्याने निविदा काढण्यात आली आहे. म्युनिसीपल हॉस्पीटल ते लोखंडी पुलापर्यंत व बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी बँकेपर्यंत आरसीसी गटार व रस्ता काँक्रीटीकरण, जामनेररोडसह जळगावरोड व यावलरोडवर रस्ता दुभाजक व सुशोभिकरण कामासाठी पालिकेने ३ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपयांची निविदा काढली होती. नाशिक येथील आर. के. इन्फ्रा या ठेकेदाराला १४ जानेवारी २०२२ रोजी दिले होते. या कामापैकी एचडीएफसी बँक ते बाजारपेठ पोलिस ठाण्यापर्यंतच्या एकेरी उत्तरेकडील मार्गाचे काम पूर्ण झाले. हे काम मुदतीत न केल्याने पालिकेने १९ मे रोजी कामाची निविदा रद्द केली. आता याच कामासाठी दुसरी निविदा प्रकाशि केली आहे.

बातम्या आणखी आहेत...