आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रभूषण डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त श्री बैठक सदस्यांनी, १ रोजी मुक्ताईनगर शहर स्वच्छता अभियान राबवले. मुक्ताईनगरसह तालुक्यातील कुऱ्हा, काकोडा, चांगदेव, उचंदा येथील श्री बैठकीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. सकाळी ७ ते १० या वेळेत स्वच्छता करण्यात आली. त्यात २.४ टन सुका व ७.१ टन ओला कचरा असा एकूण ९.५ टन कचरा संकलित केले.
अभियानाची सुरुवात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील व कन्या संजना पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी नगरसेविका सविता भलभले, नगरसेवक संतोष मराठे, वसंत भलभले, संतोष कोळी, बी.डी. महाजन , युवराज महाजन , सचिन बोदडे , विनायक वाडेकर उपस्थित होते. या अभियानाचे स्वागत झाले.
या ठिकाणी अभियान
मुक्ताईनगर बस स्टँड परिसर, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जुनी ग्रामपंचायत, प्रवर्तन चौक ते गजानन महाराज रोड, प्रवर्तन चौक ते बस स्टँड रोड अशा सहा ठिकाणी ४७० श्री सदस्यांनी स्वच्छता केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.