आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव साजरा:मुक्ताईनगरात नऊ ट्राॅली निर्माल्याचे केले संकलन

मुक्ताईनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात गणेशोत्सव साजरा न झाल्याने यंदा गणेशोत्सवात चैतन्य दिसले. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत गणरायाची मिरवणूक निघाली. दुपारपासून घरगुती गणेश विसर्जनासाठी मुक्ताई मंदिराजवळील नदीपात्रात व पूर्णा नदीपात्राकडे विसर्जनाकरिता बैलगाडी, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा अशा विविध वाहनांद्वारे श्रींना वाजतगाजत नेण्यात येत हाेते.

मोठे गणेश मंडळ व परिसरातील व इतर तालुक्यातील मोठे गणेश मंडळ संध्याकाळी सात वाजेच्या नंतर गणेश विसर्जनासाठी पारंपरिक ढोलताशांच्या गजरात प्रवर्तन चौकातून एकापाठाेपाठ एक निघाले. यावेळी संपूर्ण शहरात मुख्य रस्त्यांवर चाेख बंदोबस्त करण्यात आला होता. पूर्णा नदीवरील पुलावर गणेश मंडळांची व घरगुती गणेश विसर्जनासाठी एकच गर्दी झाली होती. वाहतूक काेंडी होऊ नये यासाठी बंदोबस्त तैनात हाेता. निर्माल्य जमा करण्यासाठी सिव्हिल सोसायटीमार्फत पूर्णा नदी पुलावर ट्रॅक्टरची सोय केली होती. या निर्माल्यापासून हरताळा जवळील रोपवाटिकत कंपोस्ट, सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.

नऊ ट्राॅली निर्माल्याचे संकलन
सिव्हिल सोसायटी ओम साई फाउंडेशन, नगरपंचायत मुक्ताईनगर व पोलिसांच्या सहकाऱ्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत निर्माल्य संकलन केले. इतर तालुक्यातून हजारो गणेश भक्त श्री विसर्जनासाठी पूर्णा नदीवर येत असतात दहा दिवसात जमा झालेले निर्माल्य ते नदीत टाकतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीने सुरू ठेवले आहे. गतवर्षी सहा तर यंदा नऊ ट्रॉली निर्माल्याचे संकलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...