आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निराेप:चिनावल येथे पारंपरिक वाद्यांच्या तालावर लाडक्या बाप्पाला निराेप

चिनावल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या चिनावल येथील श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस मंगळवारी दुपारी दोन वाजता मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. अनेक मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची १५ फुटापर्यंत तर काहींची त्यापेक्षा जास्त होती. उंच व भव्य गणेशमूर्ती यंदाचे वैशिष्ट ठरले. ढोल-ताशे या पारंपरिक वाद्यांसह बँडच्या तालावर गणेश भक्तांनी वाजत गाजत आणि नृत्य करत लाडक्या गणरायाला निरोप दिला.

मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी गावात एसआरपीएफ आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. अनेक ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिस चौकीतून लक्ष ठेवण्यात येत हाेते. मिरवणुकीसाठी प्रथम क्रमांक मिळालेल्या परिस गणेश मित्र मंडळाकडून मिरवणुकीला सुरुवात झाली.

तर क्रांती गणेश मंडळ या सोळाव्या क्रमांकाच्या मंडळाच्या श्रींच्या विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले, पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि एसआरपीएफ उपकमांडन्ट शशिकांत राम, सहायक संतोष कुण्यादत्त, विधी शाखेचे गुलानसिंह झारिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता. मिरवणूक शांततेत पार पडली.

यावल तालुक्यात २२ मंडळांकडून श्रींचे विसर्जन प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पाच गावातील २२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सात दिवसाच्या बाप्पाला मंगळवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. दुपारनंतर या गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती.

किनगाव येथे पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते. अट्रावल येथे सहा, निमगावला दोन, आडगावला दोन आणि मोहराळा गावात सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती. या सर्वच ठिकाणी दुपारपासून सवाद्य मिरवणुका निघाल्या. मोठ्या उत्साहात व शांततेत विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाला निरोप देण्यात आला. निर्विघ्नपणे मिरवणूक पार पडून बाप्पाचे शांततेत विसर्जन व्हावे, यासाठी येथील पोलिस निरीक्षक राकेश मानगावकरांच्या मार्गदर्शनात बंदाेबस्त तैनात केलेला हाेता.

बातम्या आणखी आहेत...