आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता:बोदवड येथील रासेयो स्वयंसेवकांचा निर्माल्य संकलन व विघटन उपक्रम

बोदवड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलप्रदूषण रोखण्यासाठी बोदवड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाने गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन’ हा उपक्रम राबवला.स्वयंसेवक व रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित केले. त्याचे महाविद्यालय परिसरात शनिवारी विघटन केले.

गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनिल बारी, प्रा.डॉ.माधव वराडे, प्रा.डॉ.वंदना बडगुजर, प्रा.डॉ.ईश्वर म्हसलेकर तसेच रासेयाेचे सर्व स्वयंसेवक वैभव पाटील, नागेश राठोड, वृषभ बावस्कर, आकाश माळूकर, प्राची भोई, पूनम माळी, धनश्री भोई, रोशनी बिऱ्हाडे, दिव्या सूर्यवंशी या सहभागी झाले होते असे जितेंद्र शर्मा यांनी कळवले.

बातम्या आणखी आहेत...