आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय:जिना चढण्याचा त्रास नाही, न्यायालयात 2 लिफ्ट ; न्यायालयीन इमारतीचे नव्याने बांधकाम

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यायालयाच्या इमारतीवर नवीन मजले बांधण्यात आले. मात्र, या चार मजली इमारतीत ये-जा करताना पायऱ्या चढ्याउतरण्याचा त्रास नको म्हणून २ लिफ्ट लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ वकील, पक्षकारांना वरील मजल्यापर्यंत ये-जा करण्यासाठी ही सुविधा असेल. भुसावळ येथील न्यायालयीन इमारतीचे नव्याने बांधकाम झाले. या चार मजली प्रशस्त इमारतीमध्ये कामकाजानिमित्त ये-जा करताना वकील, पक्षकार, कर्मचाऱ्यांना जिने चढ-उतार करावे लागतात. त्याचा वयोवृद्धांना त्रास होतो. त्यामुळे वकील संघाने पाठपुरावा करून पुरवणी इस्टिमेटमध्ये लिफ्ट मंजूर करून घेतली. यासाठी तांत्रिक मंजुरीत ११ काेटी रूपये शासनाकडून मंजूर केले. या निधीतून न्यायालयात लिफ्ट बसवण्यात येत आहे. सध्या या कामासाठी न्यायालयाच्या आवारात डक खोदण्याचे काम सुरू आहे. सुमारे तीन महिन्यात लिफ्टचे काम पूर्ण होईल. एका वेळी लिफ्टमध्ये आठ जण उभे राहण्याची क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...