आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:जलवाहिनीसाठी खोदकाम, दुरुस्तीची तरतूद नाही; काम पाडले तत्काळ बंद

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्रातून तापी नदीला जोडणाऱ्या ड्रेनेजचे काम हाती घेतले आहे. त्यात १२ इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यासाठी २० फूट खोल व चार मीटर रुंद खोदकाम केले जात आहे. विशेष म्हणजे या खोदकामानंतर रस्ता दुरुस्तीची तरतूद नाही. त्यामुळे तापी नगरातील नागरिकांनी रस्ता खोदकामास विरोध केला. माजी नगरसेवक अमोल इंगळे यांना बोलवून हे काम थांबवले. रस्ते कामासाठी तरतूद झाल्याशिवाय काम करू नये अशी भूमिका घेतली.

जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर गाळ आऊटलेट ड्रेनेजमधून पुन्हा तापीनदीत सोडला जात होता. तापीनगरातून जाणारी ही अंडरग्राउंड यंत्रणा पूर्णपणे चोकअप झाली आहे. दरम्यान, पालिकेने साडेपाच कोटी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण योजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतली आहे. त्यात तापी नदीला जोडणाऱ्या ड्रेनेजचे काम घेतले आहे. या कामात १२ इंच व्यासाची ५५० मीटर लांबीची नवीन पीव्हीसी पाइलाइन टाकण्यात येईल. या पाइपलाइनसाठी तब्बल २० फूट खोल खोदकाम केेेले जात आहे.

या कामाला विरोध नसला तरी पाइपलाइन टाकल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची कोणतीही तरतूद पालिकेने केली नाही. ठेकेदारालाही केवळ पाइपलाइन टाकणे व बुजवणे असे कंत्राट दिले आहे. मात्र, खोदकाम केल्यास रस्त्याचे बारा वाजतील. त्यामुळे खोदकाम सुरु होताच नागरिकांनी माजी नगरसेवक अमोल इंगळे यांना बोलवून ही माहिती दिली. यामुळे इंगळे यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पालिकेच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

तर कामाला विरोध कायम राहील
खोदकामानंतर रस्ता दुरुस्तीचे नियोजन न करणे ही गंभीर बाब आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यावर तत्काळ पाहणी केली. यानंतर काम तूर्त बंद केले आहे. खोदकामानंतर रस्ता दुरुस्तीसाठी तरतूद करावी यासाठी प्रशासक, मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. रस्त्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कामाला विरोध राहील.-अमोल इंगळे, माजी नगरसेवक

बातम्या आणखी आहेत...