आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांपूर्वी काम पूर्ण:नवीन ट्रान्स्फॉर्मरसाठी मुहूर्त मिळेना; अद्याप परवानगी नसल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा

जामठी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामठी (ता.बोदवड) येथे शेती शिवारातील एकाच रोहित्रावर अधिक भार येत होता. यामुळे येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वीज वितरण कंपनीने गावरान भागात नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवला. चार महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले. मात्र, प्रत्यक्ष ट्रान्स्फॉर्मर अजूनही सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल कायम आहेत. जामठी येथे गायरान परिसरात एकमेव ट्रान्स्फॉर्मर असल्याने येथील शेती शिवारातील वीज पंपांवर अधिक भार येत होता. शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण दाबाने वीज पोहोचत नव्हती. कमी-अधिक भारामुळे ट्रान्स्फॉर्मर वारंवार नादुरुस्त होणे, जळणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज कंपनीने या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवला. मात्र चार महिने होऊनही त्यातून अद्याप वीजपुरवठा सुरू झालेला नाही. याबाबत वीज वितरण कंपनीत विचारले असता ट्रान्स्फॉर्मर बसवल्यानंतर विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्या अद्यापही मिळाल्या नाहीत. त्यामुळे नवीन ट्रान्स्फॉर्मर अद्याप सुरू झाला नाही, असे सांगितले.

बिघाड होण्याची भीती
गेल्या आठवड्यापासून पावसाने दांडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी विहिरी, कूपनलिकांमधील पाणी उपसण्यास सुरुवात केली आहे. परिणामी एकमेव ट्रान्सफॉर्मरवर अधिकचा लोड येत आहे. नवीन ट्रान्स्फॉर्मर सुरू न केल्यास जुन्यात बिघाड होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...