आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांना ‎दिलासा:आता दीड लाख लाभार्थींना‎ देणार रेशनचे मोफत धान्य‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी‎ राज्य शासनाने १०० रुपयांत चार वस्तूंचे‎ किट दिले होते. यानंतर नवीन वर्षात ‎ ‎ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र ‎सरकारने बंद केली. त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे गहू आणि तांदूळ वाटप होणार ‎ ‎ नाही. त्याऐवजी लाभार्थींना रेशनचे धान्य ‎मोफत देण्यात येईल. शहरासह‎ तालुक्यातील १ लाख ५३ हजार ९७० लाभार्थींना याचा लाभ मिळेल.‎ कोरोना महामारीच्या काळात गरिबांना ‎दिलासा मिळावा यासाठी शासनाने रेशन ‎दुकानांतून मोफत धान्याचे वाटप केले.‎ कोरोनानंतर सुद्धा ही योजना सुरू होती.‎ गेल्या वर्षभर या योजनेंतर्गत लाभार्थींना‎ मोफत धान्य वाटप झाले. सोबतच २‎ रुपये प्रति किलो गहू आणि ३ रुपये प्रति‎ किलो तांदूळ वितरित करण्यात येत‎ आहे. ही याेजना राज्य सरकारने सुरू‎ केली आहे. आता प्रधानमंत्री गरीब‎ कल्याण याेजना केंद्र सरकारने बंद‎ केल्याने राज्याने नवीन योजना आणली.‎

लाभार्थिंचे ठसे स्कॅन न‎ झाल्यास ओटीपी पर्याय‎ काही लाभार्थींच्या बोटांचे ठसे ई-पॉस‎ मशीनवर स्कॅन होत नाहीत.अशा‎ लाभार्थींनी आधारकार्डसोबत लिंक‎ असलेला मोबाइल क्रमांक रेशन‎ दुकानदाराकडे द्यावा. दुकानदार तो‎ क्रमांक ई-पॉस मशीनवरीलओटीपी या‎ पर्यायावर नोंद करतील. यानंतर संबंधित‎ लाभार्थीच्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त‎ होईल.यामुळे लाभार्थीला धान्य मिळेल.‎ -दीपक धिवरे,तहसीलदार‎

बातम्या आणखी आहेत...