आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या सावदा विभागातर्फे शनिवारी लाइनमन दिनानिमित्त प्रकाशदूत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याहस्ते लाइनमन कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. यावेळी सुरक्षतेची शपथ देण्यात आली. सावदा विभागातील सर्व लाइनमन कर्मचाऱ्यांनी नेहमी कर्तव्याला प्राधान्य द्यावे.
घरगुती वीज, शेतीच्या विजेचे प्रश्न, जास्तीचे बिल, मीटरच्या नावात बदल, अशा समस्यांचा तात्काळ निपटारा करावा. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवाव्या. समस्या सोडवताना आपण आपल्या आरोग्याची व कुटुंबाचीही काळजी घ्यावी असे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी सांगितले. महावितरण सावदा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दोन्ही तालुक्यातील चारही उपविभागात लाइनमन दिवस साजरा करण्यात आला. नियमित तसेच बाह्यस्रोत अशा सर्वच लाइनमनचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.