आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावदा पालिकेची कारवाई:थकीत करापोटी तीन पतसंस्थांची‎ कार्यालये; 9 व्यापारी गाळे सील‎, कर वसुलीसाठी आता ढोल वाजवणार

सावदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी न‎ भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे सन २०२१-२२ या‎ आर्थिक वर्षात अडीच कोटी रुपयांची थकबाकी‎ वसुलीचे आव्हान येथील पालिकेसमोर आहे.‎ बुधवारी तीन पतसंस्थांच्या कार्यालयांसह नऊ‎ व्यापारी गाळे सिल करण्यात आले. आता यापुढे कर‎ भरणा न करणाऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून‎ करवसुली करण्यात येणार आहे.‎ मालमत्ताकर व पाणी पट्टी कर वसुलीसाठी‎ प्रत्येक भागांमध्ये लाऊड स्पीकरद्वारे नागरिकांना‎ आपल्या करांच्या रकमा वेळेत भरा, अन्यथा‎ मालमत्ता जप्तीची कारवाई होईल, असा निर्वाणीचा‎ इशारा देण्यात आला आहे. यामुळे काही प्रमाणात‎ का होईना, कर वसुली होण्यास मदत होणार आहे.‎ कर वसुलीसाठी ५ विभाग व त्याअंतर्गत ६ पथके‎ स्थापन करण्यात आली आहेत. बुधवारी संभाजी‎ चौक परिसरातील सावदा मर्चंट को-ऑप.‎ सोसायटीकडे १ लाख ९९ हजार रुपये थकबाकी,‎ दुर्गामाता चौक परिसरातील लोकसेवा पतसंस्थेकडे‎ २ लाख ४ हजार तर महावीर चौक परिसरातील तापी‎ पतसंस्थेकडे ६४ हजार रुपये असलेली थकबाकी न‎ भरल्याने त्यांची कार्यालये सिल करण्यात आली.‎ तसेच दुर्गा माता रोडवरील राणे-भंडारी शॉपिंग‎ कॉम्प्लेक्समधील गाळे क्रमांक ७, ९, १०, ११, १४,‎ १५, १८, १९ व २२ क्रमांकाचे गाळे सिल करण्यात‎ आले. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या‎ मार्गदर्शनात बुधवारी सकाळी ११ वाजता ही कारवाई‎ करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...