आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामाचा पुन्हा शुभारंभ:ग्रामपंचायत बांधकामासाठी पदाधिकाऱ्यांनी जमवले पैसे

निंभोरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरू झालेले निंभोरा ग्रामपंचायतीचे बांधकाम भूमिपूजनानंतर बंद होते. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून या बांधकामाचा पुन्हा शुभारंभ केला. सरपंच सचिन महाले यांच्या हस्ते सपत्नीक पूजाविधी झाला. सहा महिन्यात इमारत पूर्ण होईल असे सरपंच महालेंनी सांगितले. विशेष म्हणजे निधीची अडचण असल्याने सर्व सदस्यांनी रक्कम जमा करून या कामाला सुरुवात केली.

ग्रामपंचायत इमारत बांधकामाच्या शुभारंभावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य डिगंबर चौधरी, शेख दिलशाद, मनोहर तायडे, सतीश पाटील, स्वप्नील गिरडे, अमोल खाचणे, सदस्या मंदाकिनी बऱ्हाटे, संगीता राणे, सुनंदा बिऱ्हाडे, शाहीनबी खाटीक, माजी सरपंच प्रल्हाद बोंडे, माजी पं.स.सदस्य दीपक पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील महत्वाचे गाव असलेले निंभोरा मोठी बाजारपेठ आहे. येथील ग्रामपंचायतीची सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी काहीशी अपूर्ण पडते. त्यामुळे नवीन इमारतीची गरज होती. त्यासाठी आता ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...