आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया एकादशी साजरी:जया एकादशीला‎ मंदिरांमध्ये विष्णुसहस्रनाम‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघ महिन्यातील जया एकादशी‎ बुधवारी उपवास, व्रतासह विविध‎ धार्मिक कार्यक्रमांसह विष्णू‎ आराधनेने साजरी झाली. या निमित्त‎ श्रीराम मंदिरांमध्ये‎ विष्णुसहस्रनामाचे पठण करण्यात‎ अाले. तर विविध मंदिरांमध्येही‎ पूजन करण्यात आले. तसेच‎ विविध धार्मिक कार्यक्रम देखील‎ झाले. या वेळी भाविकांनी वेदना,‎ दारिद्र्य, दु:ख दूर करण्यासाठी‎ भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली.‎ शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये‎ विष्णुसहस्रनामाचे पठण करण्यात‎ आले. यासह अनेक श्रद्धाळू‎ भाविकांनी घरीच गीतेचे वाचन‎ करीत दिवसभर उपवास करीत‎ फलहार व पाणी पिऊन व्रत पूर्ण‎ केले. गुरुवारी भीष्मद्वादशीचा योग‎ आहे याचे ही नियोजन श्रद्धाळू‎ भाविकांकडून सुरू आहे. या‎ महिन्यात एकादशी व चतुर्थीचा योग‎ दोनदा आले आहे. ९ फेब्रुवारीला‎ संकष्ट चतुर्थी, १७ फेब्रुवारीला‎ भागवत एकादशी, २३ फेब्रुवारीला‎ विनायक चतुर्थी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...