आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येलाच:भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या 3 रेल्वे रद्द, एकूण 38 गाड्या रद्द, 18 गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ ते जळगावदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम होणार आहे. त्यासाठी ५ आणि ६ डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान अप-डाऊन मार्गावरील तब्बल ३८ गाड्या रद्द, तर १८ गाड्यांच्या मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ डिसेंबर रोजी भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे रद्द झाल्याने याचा परिणाम चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांवरही होणार आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल : ब्लाॅकच्या काळात बिलासपूर-हापा एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम मार्गे जाईल. हावडा-अहमदाबाद गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, भाेपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे, बराेनी-अहमदाबाद गाडी २१ डिसेंबरला इटारसी, रतलाम मार्गे धावेल. अमृतसर-नांदेड गाडी ४ व ५ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, अकाेला मार्गे, चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस ४ व ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा भाेपाळ, रतलाम मार्गे, छपरा-सूरत एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ, रतलाम, बडाेदा मार्गे, भागलपूर-सूरत गाडी ५ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ मार्गे, अहमदाबाद-यशवंतपूर गाडी २९ नाेव्हेंबरला वसई, कल्याण, पुणे, दाैंड मार्गे, पुरी-अाेखा गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, भाेपाळ मार्गे, बनारस-हुबळी गाडी ४ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, बडनेरा, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी मार्गे धावेल. दानापूर-उधना एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ, रतलाम मार्गे जाईल. पुरी-सूरत, सांत्रागाची-पोरबंदर, पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम, बडाेदा मार्गे धावेल. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बिना, रतलाम, बडाेदा मार्गे, यशवंतपूर-अहमदाबाद गाडी २७ नाेव्हेंबर व ४ डिसेंबरला दाैड, पुणे, कल्याण, वसईमार्गे धावेल. रामेश्वरम-अाेखा एक्स्प्रेस २५ नोव्हेंबर व २१ डिसेंबरला अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई मार्गे जाईल.

हा पर्याय उपलब्ध असेल : भुसावळ, जळगावहून मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबादला खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय उपलब्ध आहे. शिवाय बहुतांश ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेही प्रवाशांना जाता येईल. सध्या जळगावची विमानसेवा बंद आहे. भुसावळातून वाढीव बसफेऱ्या : डिसेंबर महिन्यातील ब्लाॅकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसाेय टाळण्यासाठी महामंडळ भुसावळ बसस्थानकावरून लांबपल्ल्याच्या गाड्या चालवणार आहे. नाशिक, अकाेला, सूरत, बऱ्हाणपूर या मार्गावर जादा गाड्या चालवण्याचे नियाेजन करण्यात येईल. शिवाय एखादे गाव-शहराला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल तर विशेष गाड्या साेडल्या जातील, असे भुसावळचे अागारप्रमुख पी.बी.चाैधरी यांनी सांगितले.

विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन मुख्यालयातून रेल्वे ब्लॉक संदर्भातील निर्णय रेल्वे मुख्यालयाकडून घेतला जातो. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन तेथूनच होते. वाढीव गाड्यांचे नियोजनही तेथूनच होईल. विकासकामांसाठीचा हा ब्लॉक अाहे. -डॉ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

नागपूर-मुंबई सेवाग्रामसह या रेल्वेच्या फेऱ्या नाही {४ डिसेंबर : बांद्रा-भुसावळ, भुसावळ-बांद्रा, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस. {५ डिसेंबर : नागपूर-मुंबई सेवाग्राम, मुंबई-नागपूर सेवाग्राम, अमरावती-मुंबई, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस {६ डिसेंबर : भुसावळ-बांद्रा. पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे हुतात्मा, भुसावळ-देवळाली शटल, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-सुरत, भुसावळ-कटनी पॅसेंजर, बांद्रा-भुसावळ, याशिवाय इतर रेल्वे गाड्याही रद्द आहेत.

बातम्या आणखी आहेत...